राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद प्रतीक्षेत.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान ग्रामीण जिल्हाध्यक्ष माजी आमदार चंद्रशेखर घुले यांचा कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे त्यांच्या जागी नव्या ग्रामीण जिल्हाध्यक्षाची नियुक्ती प्रतीक्षेत आहे. या पदावर पुन्हा काम करण्याची उत्सुकता घुले यांनी दाखवली नसल्याने अन्य इच्छुकांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडे फिल्डिंग लावली आहे. 


Loading...
प्रत्येकाची यासाठी रस्सीखेच सुरू असल्याने व कोणत्याही नावावर एकमत होत नसल्याने नगरची नियुक्ती लटकल्याचे सांगितले जाते. कर्जतचे राजेंद्र फाळके, जामखेडचे राजेंद्र कोठारी, पारनेरचे सुजित झावरे, पाथर्डीचे प्रताप ढाकणे व कोपरगावचे संदीप वर्पे यांनी आपापल्या परीने या पदावर दावा करताना वरिष्ठांकडेही यादृष्टीने जोरदार पाठपुरावा सुरू केल्याचे सांगितले जाते. या इच्छुक पाचजणांमध्ये व त्यांच्या समर्थकांमध्ये एकाच नावावर एकमत होत नसल्याने पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनीही नगरची जिल्हाध्यक्ष निवड लांबणीवर टाकल्याचे सांगितले जाते.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.