जामखेडमध्ये एसटी बस वाहकावर गोळीबार.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- जामखेड-बीड रस्त्यावर बुधवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास जामखेड एसटी बसचा वाहकावर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारामध्ये वाहक सुग्रीव जायभाय गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 


Loading...
याबाबत सविस्तर माहिती अशी, तालुक्यातील सुग्रीव गहिनीनाथ जायभाय ( वय -४३, रा. जायभायवाडी सध्या राहणार - गोडाऊन गल्ली, जामखेड ) हे रात्री अडीच वाजता जामखेड ग्रामीण रुग्णालयात चालत आले. त्यावेळी जायभाय यांच्या मांडीतून रक्त येत होते. गोळीबारात जखमी झालेले सुग्रीव जायभाय जामखेड आगारात वाहक म्हणून कार्यरत आहेत. 

फेब्रुवारी महिन्यात डॉ. पठाण यांच्या मांडीवर दिवसाढवळ्या गोळीबार झाला होता. त्यांच्यासह आणखी एक जण गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर २९ एप्रिल रोजी योगेश राळेभात व राकेश राळेभात यांच्यावर गोळीबार होऊन दोघे मृत्यू पावले होते. 


त्यानंतर बुधवार दि. १५ आॅगस्ट रोजी पहाटे अडीच वाजता सुग्रीव जायभाय यांच्यावर गोळीबार होऊन जखमी झाले आहेत. गोळीबाराच्या या घटनेमुळे जामखेड शहरसह तालुक्यात घबराटीचे वातावरण झाले आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.