भीषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर तालुक्यातील अरणगाव ते वाळकी मार्गावर असणा-या बाबुर्डी घुमट गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात एक दुचाकीस्वार जागीच ठार झाला. त्यानंतर संतप्त झालेल्या जमावाने स्कार्पिओ गाडी पेटवून दिली. 


Loading...
याबाबत अधिक माहिती अशी, नगर तालुक्यातील अरणगाव येथून वाळकी गावाकडे जाणा-या मार्गावर बाबुर्डी घुमट गाव आहे. या गावातील सोमनाथ धमार्जी परभाने ( वय - ४१ बाबुर्डी घुमट) यांच्या दुचाकीला महिंद्रा टी.यु.व्ही - ३०० (एम. एच.- १६,बी.वाय.५४७०) या कंपनीच्या वाहनाने जोरदार धडक दिली. 

यात परभाने ठार झाले. हा अपघात सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास बाबुर्डी जवळ झाला. अपघाताची माहिती समजताच गावातील लोक घटनास्थळी जमा झाले. त्यांनी संतप्त होऊन महिंद्रा कंपनीची गाडी पेटून दिली. गाडी पेटवल्याने तणाव निर्माण झाला. 

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.