ऐन पावसाळ्यात शहरात अस्वच्छतेचा कळस,महापालिकेची आरोग्य यंत्रणा झोपेत


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- ऐन पावसाळ्यात शहरातील नाले-गटारांची साफसफाईच होत नसल्यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. डासांची पैदास वाढली असून, शहरात साथरोगांचा उद्रेक मोठ्या प्रमाणावर बळावला आहे. सर्वच प्रभागांची अवस्था अत्यंत केविलवाणी असून, नागरिकांच्या हिताचा आव आणणाऱ्या महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेने झोपेचे सोंग घेतले असून, प्रभाग अधिकारी आणि नगरसेवक आहेत तरी कोठे, असा सवाल उपस्थित होत आहे. 


Loading...
साफसफाईच्या मुद्यावर आरोग्य विभागाचा गलथान कारभार समोर आल्यानंतरही पदाधिकाऱ्यांनी साधलेल्या चुप्पीवर नगरकर आश्चर्य व्यक्‍त करीत आहेत. नगरकरांना साफसफाई, पथदिवे, पाणीपुरवठा, रस्ते आदी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची महापालिका प्रशासनाची नैतिक जबाबदारी आहे. महापालिकेच्या आस्थापनेवर 600 ते 650 सफाई कर्मचारी असून, त्यांची शहरातील प्रभागांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. 

बहुतांश कर्मचाऱ्यांना जाणीवपूर्वक कार्यालयांमध्ये नियुक्‍त दिली आहे. त्याबरोबर कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. रस्त्याची साफसफाई सोडली तर कर्मचारी गटार व नाल्याची साफसफाई केवळ वारंवर केली आहे. आज रस्त्याच्या बाजूला असलेल्या गटारींवर मोठ्या प्रमाणावर गवत वाढले आहे. परंतू ते काढण्याची तसदी देखील कर्मचाऱ्यांनी घेतलेली नाही. 


त्यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे सर्वत्र आनंदी आनंद आहे. मुख्य रस्ते, सार्वजनिक जागा, बाजारपेठ, खुली मैदाने तसेच प्रभागांमध्ये दैनंदिन साफसफाई होणे अपेक्षित असताना प्रभागात पंधरा-पंधरा दिवस सफाई कर्मचारी फिरकत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे प्रभागातील नाल्या-गटारे घाणीने तुडुंब साचली आहेत. 


नाल्या तुंबल्याने डासांची पैदास वाढली असून, नगरकरांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. प्रभागांमधील साफसफाईची जबाबदारी क्षेत्रीय अधिकाऱ्यांची असली तरी प्रभागांमधील चित्र पाहता, क्षेत्रीय अधिकारी, आरोग्य निरीक्षक आणि संबंधित नगरसेवकांच्या कार्यशैलीवर नगरकरांमध्ये तीव्र संताप व्यक्‍त केला जात आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
-------------------------------
Powered by Blogger.