मनपा मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या नगरसेवक राठोड,गाडे यांच्यावर कारवाई करा - श्रीपाद छिंदम


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर महापालिकेच्या उपमहापाैर दालनात प्रवेश करून उपमहापौरांची प्रशासकीय खुर्चीसह मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी नगरसेवक विक्रम राठोड यांच्यासह संबंधितांवर कारवाईची मागणी वादग्रस्त श्रीपाद छिंदम याने जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त राहुल द्विवेदी यांच्याकडे केली आहे. 


Loading...
या निवेदनात म्हटले आहे की, महापालिकेचे नगरसेवक विक्रम राठोड, योगीराज गाडे, मुन्ना भिंगारदिवे, दीपक कावळे, महेश शेळके, रावजी नांगरे, आशा निंबाळकर, महिला शहर प्रमुख अरुणा गोयल, उषा ओझा यांच्यासह चार ते पाच जणांनी ८ मार्चला उपमहापौरांच्या दालनात प्रवेश करून प्रशासकीय खुर्चीची मोडतोड केली. 

या प्रकाराचे व्हिडीओ चित्रीकरण आहे. या प्रकरणी आयुक्तांनी मनपाच्या मालत्तेचे आर्थिक नुकसान करणाऱ्यांविरोधात सदस्य व त्यांच्या सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल करणे गरजेचे होते. या घटनेबाबत कोणतीही कार्यवाही सुरू नाही. 


मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करून कारवाई तसेच मनपा अधिनियमानुसार सदस्यत्वही रद्द करावे, असे निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, या पत्रावर द्विवेदी कोणती भूिमका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.