संगमनेर मध्ये विजेच्या धक्क्याने तरुणीचा मृत्यू.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- संगमनेर तालुक्यातील ओझर खुर्द येथील आदिवासी समाजातील व अतिशय गरीब कुटुंबातील शितल सोमनाथ पिपंळे (वय १५ वर्षे) या तरुणीचा विजेचा जोरदार धक्का बसल्याने दुर्दैवी मृत्यू झाला.मंगळवारी सकाळी पावणे नऊ वाजेच्या सुमारास शितल पिंपळे ही तरुणी जनावरांना गवत आणण्यासाठी ओझर खुर्द येथीाल प्रवरानदी किनारी गेली होती.


Loading...
यावेळी तिच्या बरोबर दोन ते तीन मुली होत्या. प्रवरानदीतीरावर असलेल्या विहरीशेजारी गवत कापत असताना तिला विजेचा जोरदार धक्का बसला. त्यामुळे तिच्याबरोबर असलेल्या मुलींनी आरडा-ओरडा करण्यास सुरवात केल्याने आसपास असलेल्या लोकांनी तिकडे धाव घेऊन शितलला वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु, विजेचा जोरदार धक्का बसल्याने तिचा जागेवर मृत्यू झाल्याचे लोकांच्या लक्षात आले. 

या घटनेची माहिती मिळताच आश्वी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. शितलचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी संगमनेर येथील सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला. शितलच्या पश्चात आई, वडील, तीन बहिणी असा परिवार असून या तरुणीच्या घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची असल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी दिली.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.