पत्नीने कुऱ्हाडीने केला दारूड्या नवऱ्याचा खून,आरोपी पत्‍नीस अटक.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- कोपरगाव तालुक्यातील मोहिनीराजनगर येथील विटभट्टीवरील दारू प्‍यायलेल्‍या मजूर पती-पत्‍नीत राहत्या घरी झालेल्‍या भांडणात चिडलेल्‍या पत्‍नीने कुऱ्हाडीने व विटाने मारून दारूड्या नवऱ्याचा खून केला. गुन्‍हा लपविण्याचा प्रयत्‍न केला. याप्रकरणी मयताच्‍या भावाने दिलेल्‍या फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलिसात गुन्‍हा दाखल करण्यात आला असून आरोपी पत्‍नीस अटक करण्यात आली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती देताना शहर पोलीस स्‍टेशनचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव म्‍हणाले, मयत रघुनाथ व पत्‍नी शांताबाई यांच्‍यात पती दारू पिल्‍यानंतर वारंवार भांडणे होत. त्‍याच भांडणांना वैतागुन शांताबाईने सोमवारी १३ ऑगस्‍ट रात्री ९ ते १० वाजेच्‍या सुमारास रात्री रघुनाथ यांच्‍या डोक्‍यात विटाने व कुदळीने मारहाणकरून जबर जखमी केले. अतिरक्तश्राव झाल्‍याने रघुनाथ मयत झाला. Loading...
आरोपी शांताबाईने मयत रघुनाथचा मृतदेह घरापासुन लांब २५ फूट ओढत नेऊन त्‍यास कपडयाखाली झाकुन ठेवले. शांताबाईचा मुलगा बाळासाहेब हा रात्री ११.३० वाजता कामावरून घरी आल्‍यावर त्‍याने आईला शांताबाईला वडील कोठे आहे, अशी विचारणा केली असता तिने तुझे वडील दारू पिऊन माज्याशी भांडले व मारामाऱ्या केल्‍या. त्‍यामुळे ते आता लांब झोपले आहेत. त्‍यांना उठवू नको असे सांगितले; मात्र सकाळ झाली तरी आपले वडील अजून का उठले नाहीत. ही गोष्ट बाळासाहेबाच्‍या लक्षात आली. 

त्‍यानंतर त्‍याने पाहिले असता वडील मयत झाल्‍याचे त्‍याच्‍या लक्षात आले. विटभट्टीचे मालक रविंद्र चंद्रकांत आढाव यांनी पोलिसांना कळविले. पोलीस घटनास्‍थळी दाखल झाले. पाठोपाठ फॉरेन्‍सीक लॅबचे तपासणी पथक दाखल झाले त्‍यांनी गुन्‍हयात वापरलेली कुदळ, विटा जप्‍त केल्‍या. 


आरोपी शांताबाई ही मयत रघुनाथ याची दुसरी बायको होती. तिला मूलबाळ काही नव्‍हते. तिनेच रघुनाथच्‍या मुलांना मोठे केले. मुलीचे लग्‍न होऊन ती सासरी नांदत आहे. मुलगा बाळासाहेब हा गावातच लहानसहान कामे करतो, असे समजते.


याबाबत हकिकत अशी, सोमवारी १३ ऑगस्‍ट रात्री ९ ते १० वाजेच्‍या सुमारास मयत भाऊ रघुनाथ लहानु गायकवाड (वय ४८, रा. आढाव वस्ती, मोहीनीराजनगर) त्‍यांची पत्‍नी आरोपी शांताबाई रघुनाथ गायकवाड (वय ४०, रा. आढाव वस्‍ती, माहिनीराजनगर) यांच्‍यात दारू पिऊन झालेल्‍या भांडणाचे कारणावरून आरोपीने कुऱ्हाड व विटेने मयताचे डोक्‍यात व कानाजवळ गंभीर दुखापत करून जीवे ठार मारले असल्‍याची फिर्याद मयताचा भाऊ बाळासाहेब लहानू गायकवाड (वय ५५, शेतमजुरी (रा. कोकणठाण, ता. कोपरगाव) यांनी कोपरगाव शहर पोलिसात दिली. 


सदरच्‍या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी शांताबाई यांच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल केला असून आरोपी शांताबाईस अटक केली आहे. दरम्‍यान घटनेची माहिती मिळताच शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजित शिवतारे यांनी भेट देऊन माहिती घेऊन निर्देश दिले.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
-------------------------------
Powered by Blogger.