विरोधकांना कामे न करताच आमदार होण्याची स्वप्नं पडताहेत-आ.कर्डिले

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- विरोधकांना कामे न करताच आपण आमदार होणार अशी दिवास्वप्नं पडत असून मतदारसंघात रस्त्यांसह अनेक कोटींची कामे मार्गी लागल्याने सर्वसामान्यांचा माझ्यावरील विश्वास वाढल्याने यावेळी मतदार एक लाखाच्या वर मते देतील, असा विश्वास आ. शिवाजीराव कर्डिले यांनी व्यक्त केला.राहुरी येथे अर्थसंकल्पीय कामे अंतर्गत राहुरी-मांजरी रस्त्याच्या देखभाल दुरूस्ती कामाच्या भुमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी खंडेराय देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रावसाहेब (चाचा) तनपुरे होते. 

आ. कर्डिले पुढे म्हणाले, राहुरी-मांजरी रस्ता अनेक दिवसांपासून खराब झालेला होता. त्यामुळे पूर्व भागातील नागरिकांसाठी हा रस्ता दुरूस्त होणे आवश्यक होते. लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना आपण गटातटाचा विचार कधीच केला नाही. सत्तेच्या माध्यमातून मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, मदत व पुनर्वसन खात्याचा मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून अनेक कोटींची रस्त्यांची कामे मार्गी लावली. 

Loading...

राहुरी शहराच्या नवीन प्रस्तावित पाणीपुरवठा योजनेसाठी आपण पाठपुरावा करत आहे. मुळा नदीवर के.टी.वेअर बंधारा होण्यासाठी लवकरच संबंधित ग्रामस्थ व अधिकारी यांची बैठक घेवून निर्णय घेवू असेही त्यांनी सांगितले.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
-------------------------------
Powered by Blogger.