पोलीस निरीक्षकाच्या निवासस्थानातून शासकीय ड्रेस चोरीला !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शेवगाव पोलीस ठाण्यात आल्या पासून विविध कारणांनी चर्चेत असलेल्या पोलीस निरीक्षक गोविंद भगवान ओमासे यांना शिवसंग्राम पक्षाच्या तालुकाध्यक्षाने सहा लाख २० हजारांचा गंडा घातल्याची घटना व्हायरल होत नाही तोच त्यांच्या निवासस्थानातून त्यांची शासकीय पूर्ण खाकी वर्दीच चोरीला गेल्याचा प्रकार घडला आहे.


Loading...
यासंदर्भात ओमासे यांनीच शेवगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटयाविरुध्द फिर्याद दाखल केली आहे. पोलीस निरीक्षक ओमासे हे येथील विद्यानगर भागात भाडोत्री घरात राहतात. काल रविवार,दि. १२ रोजी सकाळी सातपूर्वी त्यांच्या घरातील कपाटात तसेच अन्यत्र असलेले ६२५ रुपये किमतीचे दोन सरकारी खाकी ड्रेस, कॅप व लालरंगाचे बूट अज्ञात चोरटयांनी चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. 

पोलिसांनी अज्ञात चोरटयाविरुध्द ३८०, ४५७ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. हेकाँ. नानासाहेब गर्जे हे तपास करत आहेत. दस्तुर खुद्द पोलीस निरीक्षकाच्या निवासस्थानातून शासकीय ड्रेस चोरीला जात असतील तर येथील सामान्यांची काय स्थिती असेल ? या बद्दल शहरात चर्चा होत आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.