उड्डाणपुलाच्या ठरावाबाबत नगरसेवक सुवेंद्र गांधी यांचे अज्ञान !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर उड्डाणपुलाबाबतचा ठराव अजून रेकॉर्डवर नसताना केवळ शिवसेनेला श्रेय मिळत याचे शल्य असल्याने टीका केली जात आहे. 


Loading...
आम्ही उड्डाणपुलाच्या भूसंपादनासाठी तीसच काय पण चाळीस टक्के निधी देण्यास तयार आहोत. शहरात उड्डाणपूल झाला पाहिजे ही शिवसेनेची भूमिका आहे. महापौर कार्यालयातून कुठेही अजून ठरावच पाठवला नाही, तथापि हे भाजपचे नगरसेवक सुवेंद्र गांधी यांचे अज्ञान आहे, अशी घणाघाती टीका शिवसेनेचे नगरसेवक अनिल शिंदे व माजी शहरप्रमुख संभाजी कदम यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली. 

भाजप नगरसेवक सुवेंद्र गांधी यांनी दोन दिवसांपूर्वी महासभेत भूसंपादनासाठी सात कोटी देण्यास मंजुरी मिळाली असताना राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाला वेगळाच ठराव देऊन विश्वासघात केल्याचा आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर सोमवारी शहरातील शिवालयात आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेनेने भाजपला प्रत्युत्तर दिले आहे. 


या वेळी शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड, शहरप्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक अनिल शिंदे, संजय शेंडगे, सचिन जाधव, माजी शहरप्रमुख संभाजी कदम आदी उपस्थित होते. 

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.