पाथर्डी -शेवगावच्या लोकप्रतिनिधी मोनिकाताई राजळे कार्यक्षम आमदार : खडसे


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पाथर्डी -शेवगावच्या लोकप्रतिनिधी म्हणून आमदार मोनिकाताईं राजळे यांचे विकासाचे काम कौतुकास्पद असून, त्यांना पुन्हा विकास करण्याची संधी द्यावी, असे आवाहन माजीमंत्री एकनाथ खडसे यांनी केले. सामाजिक समतेचा संदेश हजारो वर्षांपूर्वी नाथ सांप्रदायाने दिला, तीच शिकवण आचारणात आणून समाजातील उपेक्षित व दुर्बल घटकांसाठी काम करण्याकरिता सवांर्नी पुढे यावे, असे खडसे या वेळी म्हणाले. 


Loading...
श्रावण मासानिमित्त खडसे यांनी वृद्धेश्वर, मायंबा, मढी येथे भेट देऊन दर्शन घेऊन महापूजा केली. या वेळी मढी देवस्थान समितीने त्यांचे स्वागत केले. या वेळी आ. मोनिकाताई राजळे, जि.प. सदस्य राहुल राजळे, पुरुषोत्तम आठरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, प. स. सदस्य रवींद्र वायकर, सुनील परदेशी, देवस्थानचे अध्यक्ष अण्णासाहेब मरकड, माजी सरपंच देवीदास मरकड, सचिव सुधीर मरकड, विश्वस्त शिवाजी मरकड, अप्पासाहेब मरकड, मधुकर साळवे, बबनतात्या मरकड, उपसरपंच रवींद्र आरोळे, भारत मरकड भानुविलास मरकड, चंद्रकांत मरकड, गणेश पाखरे, बाळासाहेब मरकड, बंडू मरकड आदी उपस्थित होते. 

मढी ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी खडसे यांचा या वेळी सत्कार केला. या वेळी बोलताना खडसे म्हणाले, हजारो वर्षांपूर्वी नाथ सांप्रदायाची ध्यानधारणा वृद्धेश्वर येथे झाली. त्याच सांप्रदयाची विस्तारित शाखा म्हणून वारकरी सांप्रदायाकडे पाहिले जाते. मढी, मायंबा, वृद्धेश्वर स्थानांचे पंढरपूर एवढेच महत्व आहे. मढी देवस्थान हे छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती शाहु महाराजांचे कुलदैवत असल्याची माहिती वाचून धन्य झालो. 


वृद्धेश्वर देवस्थानचे अध्यक्ष सुधाकर पालवे व मायबा देवस्थानचे अध्यक्ष दादासाहेब चितळे यांनी खडसे यांचा सन्मान केला. आमदार मोनिका राजळे यांचे सत्तेमध्ये पुनर्वसन करण्याची मागणी भाजप कार्यकर्त्यांनी या वेळी केली. त्यावर खडसे म्हणाले, आमदार राजळे यांच्यावर सर्वच नेत्यांची कृपादृष्टी असून, त्या कार्यक्षम आहेत, असे म्हणत त्यांच्या कामाचे त्यांनी कौतुक केले.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
-------------------------------
Powered by Blogger.