जामखेड बाजार समितीत लॅपटॉप सह दीड लाखांची चोरी


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- जामखेड येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समिती मधील कुमटकर ॲण्ड मेंगडे व मे आनंद ट्रेडिंग कंपनी या भुसार आडत दुकानाचे शटर उचकटून चोरांनी रोख रक्कमेसह लॅपटॉप आणि प्रिंट्स यांची चोरी केली आहे. 

Loading...
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी कल्याण अनंदराव ढवळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून श्री छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समितीत आनंद ट्रेडिंग कंपनी नावाने आडत दुकान आहे. समोर मे कुमटकर ॲण्ड मेंगडे प्रा.रा.त्रिंबक कुमटकर यांचीही आडत दुकान आहे. 

रात्री ६ ते पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास आमच्या दुकानाचे शटर उचकटून दुकानाच्या गल्ल्यातील २५ हजार रुपयांची रोख रक्कम आणि मे कुमटकर ॲण्ड मेंगडे यांच्या दुकानातील गल्ल्यातील १ लाख १६ हजार आणि लॅपटॉप अज्ञात चोरांनी चोरून नेला आहे. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.