आजही छिंदमला भाजपाचा छुपा पाठिंबा,त्याचा राजीनामा खा.गांधीच्या कार्यालयातूनच !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- खा. दिलीप गांधी यांनी छिंदमची हकालपट्टी केल्याचे स्पष्ट करुन त्याचा उपमहापौरपदाचा राजीनामा घेतल्याचे जाहिर केलेे होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी खा. गांधी यांच्या कार्यालयातून त्याच्या राजीनाम्याची प्रत महापौर व आयुक्तांच्या कार्यालयात आली होती. आजही छिंदमला भाजपाचा छुपा पाठिंबा आहे अशा शब्दात शिवसेनेने खा. गांधींना प्रत्युत्तर दिले. 

भाजपाने केलेल्या टिकेला प्रत्युत्तर देण्यासाठी शिवालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेला शिवसेना उपनेते अनिल राठोड, शहरप्रमुख दिलीप सातपुते , संभाजी कदम, अनिल शिंदे, सचिन जाधव, संजय शेंडगे, सुरेश तिवारी, योगीराज गाडे आदी उपस्थित होते. 


Loading...
यावेळी बोलतांना शहरप्रमुख दिलीप सातपुते म्हणाले छिंदमचा राजीनामा घेतला नसल्याचे खा. गांधी यांनी सांगितले. तो खासदारांचा मानसपूत्र आहे. खा. गांधी हेच छिंदमला बरोबर घेवून मुख्यंत्री, व अनेक मंत्र्याकडे गेल्याचे फोटो यापूर्वी प्रसिध्द झालेले आहे. 

छिंदमच्या नगरसेवक पदाचा राजीनामा जेलमधून आणण्याचे सुवेंद्र गांधी यांनी महासभेत जाहिर केले होते. त्याचे व्हिडीओ रेकॉडींग आहे. मनपा सभेला येण्यासाठी खासदारांच्या सांगण्यावरुन छिंदमला पोलिस बंदोबस्त देण्यात आला होता. अशी माहिती आम्हाला मिळाली आहे, असा आरोप यावेळी सातपुते यांनी केला. 

यावेळी बोलतांना संभाजी कदम म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांबाबत त्यांचे बेगडी प्रेम सर्वांना समजले आहे. छिंदमचा राजीनामा घेतल्याची क्लिप सर्वत्र व्हायरल झालेली असताना खा. गांधींकडून खोटी माहिती दिली जात आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.