नगरचा इतिहास मॉरीशसच्या विश्व हिंदी सम्मेलनात


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :भारत सरकारच्या विदेश मंत्रालय, विश्व हिंदी सचिवालय व मॉरीशस सरकारच्या वतीने आयोजित मॉरीशस येथे आयोजित 11 व्या विश्व हिंदी सम्मेलनासाठी येथील डॉ.अमोल बागुल यांच्या 'अहमदनगर की ऐतिहासिक धरोहर' या शोधनिबंधाची निवड झाली आहे.
Loading...

स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय सभा केंद्र, पाई, मॉरीशस असे नामकरण केलेल्या संमेलन नगरीत 18 ते 20 ऑगस्ट 2018 दरम्यान द्विपक्षीय सरकारच्या वतीने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.ह्या वर्षीच्या संमेलनाची 'हिंदी विश्व व भारतीय संस्कृती' ही संकल्पना आहे. 

डॉ. अमोल बागुल यांनी प्रस्तुत शोधनिबंधातुन ऐतिहासिक अहमदनगर शहराच्या वैभवशाली 528 वर्ष्याचा आलेख विविध ऐतिहासिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक,आर्थिक,राजकीय,धार्मिक,अध्यात्मिक, साहित्यिक, स्वातंत्र्य पूर्व व स्वातंत्र्यानंतरच्या सामाजिक अभिसरणातून मांडला आहे. 

हिंदी भाषेच्या विकास तसेच प्रचार प्रसारासंबंधित प्रदर्शनाचे देखील आयोजन करण्यात आले आहे. भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद, नवी दिल्ली द्वारा सांस्कृतिक कार्यक्रम आणि कवीसंमेलनाचे देखील आयोजन करण्यात आले आहे.

डॉ. बागुल यांनी राष्ट्रभाषा हिंदीविषयक अनेक स्पर्धा परीक्षा, उपक्रम, लेखन, नाटक एकांकिकाच्या माध्यमातून तसेच आंतरराष्ट्रीय हिंदी सेवी संस्थाच्या सहयोगातुन हिंदी भाषा प्रचार प्रसाराच्या कार्यात आपला सहभाग नोंदविला आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.