सायबर कॅफे टाकण्यासाठी माहेरहून दोन लाखाच्या मागणीसाठी विवाहितेचा छळ

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- सायबर कॅफे टाकण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये आणावेत, यासाठी विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी शिर्डी पोलिसांत संदीप म्हाळू राऊत, म्हाळू मल्हारी राऊत, अलका म्हाळू राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Loading...
याबाबत शिर्डी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत अश्विनी संदिप राऊत (रा. निपाणी वडगाव, श्रीरामपूर, हल्ली मुक्काम पोहेगाव, तालुका कोपरगाव) यांनी म्हटले आहे की, सायबर कॅफे टाकण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये आणावेत, यासाठी संदीप महाळू राऊत, महाळू मल्हारी राऊत,अलका महाळू मल्हारी राऊत यांनी शिवीगाळ करून लथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत शिर्डी पोलिसात गुन्हा रजी. नं. १७७/१८ भा.दं वि. कलम ३२३, ५०४, ५०६, ४९८ अ प्रमाणे दाखल करण्यात आला आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.