न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा मी भोगतोय,मंत्रीपदापेक्षा समाज महत्त्वाचा - एकनाथ खडसे.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- ओबीसी फाउंडेशनच्या वतीने सहकार सभागृहात आयोजित स्पर्धा परीक्षांच्या गुणगौरव कार्यक्रमात खडसे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी एकनाथ खडसे यांनी मंत्रीपदावरून काढल्याची मनातील खदखद पुन्हा एकदा जाहीरपणे व्यक्त केली. 


Loading...
आपल्या भापणातून न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा मी भोगतोय. मात्र, सत्ता व मंत्रीपदापेक्षा समाज महत्त्वाचा आहे. समाजासाठी मी बोलत राहणार आहे. ओबीसी समूहाच्या संदर्भात महाराष्ट्रात सर्वप्रथम स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनीच निर्भयपणे भूमिका मांडली, असे सांगून ओबीसीच्या हक्काच्या आरक्षणातील एकट्याला जरी धक्का लागला तर जाब विचारण्यासाठी सर्वात अग्रभागी मी असेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. 

स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, अधिकारी झाल्यानंतरही समाजाचे उत्तरदायित्व जपण्याचा सल्ला दिला. जातनिहाय जनगणना करण्याची मागणी कायम असल्याचा निर्वाळा त्यांनी यावेळी दिला.खडसे यांच्या आधी शिवसेनेचे संघटक गोविंद घोळवे व प्रकाश शेंडगे यांनी आपल्या भाषणातून खडसेंवर झालेल्या अन्यायाकडे लक्ष वेधले. 

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.