आ.विनायक मेटेंचा नातेवाईक असल्याचे भासवून पोलिस निरीक्षकांची साडेसहा लाखांची फसवणूक.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शेवगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोविंद भगवान ओमासे यांची सहा लाख वीस हजार रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून शिवसंग्राम संघटनेचे शेवगाव तालुकाध्यक्ष नवनाथ हरिचंद्र इसारवाडे (रा.गदेवाडी ) याच्याविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. 


Loading...
चक्क पोलीस निरीक्षकांनाच फसवले गेल्यामुळे तालुक्यात हा चर्चेचा विषय झाला आहे. शिवसंग्राम संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार विनायक मेटे यांचा हुबेहूबआवाज काढून ही फसवणूक केल्याचे म्हटले आहे .या बाबत पो.नि.गोविंद ओमासे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की , नवनाथ इसारवाडे याने मी आमदार विनायक मेटे यांचा नातेवाईक आहे.

तसेच त्यांच्या शिवसंग्राम पक्षाचा तालुकाध्यक्ष असल्याचे सांगून विश्वास संपादन करून, मेटे यांचा मोबाईल नंबर ९४२३२४९१९१ असा सांगून व वेळोवेळी सदर फोनवरून कॉल करून. त्याने स्वत: व त्याचा एक अज्ञात साथीदार यांनी संगनमत करून व आमदार मेटे यांचा हुबेहूब आवाज काढून आमदार मेटे बोलतात. 


असे भासवून वेळोवेळी वेगवेगळ्या कारणांसाठी पैशाची मागणी करून पो.नि.ओमासे यांच्याकडून व साक्षीदारांकडून ६ लाख २० हजार रुपये घेऊन फसवणूक केली आहे.या प्रकरणी पोलिसांनी नवनाथ इसारवाडे व त्याच्या साथीदाराविरुध्द भा.दं.वि.कलम ४१९,४२० ,३४ अन्वये गुन्हा दाखल केला असून, स.पो.नि. नितीन मगर हे अधिक तपास करत आहेत.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.