मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याची मागणी


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- आरक्षणाच्या प्रतिक्षेत असलेल्या मुस्लिम समाजास आरक्षण नसल्याने शासकीय नोकऱ्यांपासून हा समाज वंचित आहे. त्यामुळे मुस्लिम समाजास शासनाने पाच टक्के आरक्षण जाहीर करावे, अशी मागणी शिर्डी शहरातील मुस्लीम समाजाच्या वतीने करण्यात आली.


Loading...
शिर्डीच्या प्रांताधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुस्लीम समाजाने आरक्षण देण्याबाबत शासनास अतापर्यंत असंख्य निवेदने, शांतता मार्गाने कृती आंदोलने केली. स्वातंत्र्यानंतर भारतातील मुस्लिम समाज सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक अधोगतीत राहिला आहे. 

या समाजाची अवस्था अत्यंत केविलवाणी झाली आहे. त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षणाची आवश्यकता आहे. असे असताना याबाबत शासनाकडुन कोणतीही कृती होताना दिसत नाही. सर्व समाजासाठी समान संधी, समान न्याय व समान वाटा देणे हे मुख्यमंर्त्यांचे घटनात्मक कर्तव्य आहे; मात्र अत्यंत संवेदनशील असलेल्या मुस्लीम आरक्षणाच्या मुदयावर शासन वेळोवेळी चालढकल करत आहे.


 यावेळी शासनाने मुस्लीम समाजास तातडीने आरक्षण जाहीर करावे, अन्यथा शांततेच्या मार्गाने आजवर लढा देणाऱ्या मुस्लीस समाजास आक्रमक होऊन आंदोलन करावे लागेल, असा इशारा निवेदनात दिला आहे. यावेळी समीर शेख, जावेद शेख, गफ्फारखान पठाण, रज्जाक शेख, सलिम शेख, आदम सय्यद, शफिक शेख, बाबुलाल शहा, हमिदबाबा पठाण, आजीम शेख, बाबाभाई सय्यद, सईद शेख, इकबाल शेख यांच्यासह मुस्लीम समाज बांधव उपस्थित होते.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.