जामखेड तहसीलदारांवर वाळूतस्करांचा हल्ला.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- जामखेड तालुक्यातील धनेगाव येथील खैरी नदीपात्रात रात्री बाराच्या सुमारास अवैध वाळूची वाहतूक करताना तलाठयाने अडवले असता वाळूतस्करांनी दगड, लाकडी दांडक्याने कुऱ्हाडीने मारहाण केली. यामध्ये तलाठी गंभीर जखमी झाला. 


Loading...
सदर घटना तहसीलदार यांना समजताच तहसीलदार कारने घटनेच्या ठिकाणी आले असता वाळू तस्करांनी त्यांची कार अडवून त्यावर दगडफेक करून कुऱ्हाडीने वार करून त्यांच्या ताब्यातील वाळूचा टिपर घेऊन पळून गेले. 

याबाबत जामखेड पोलिस ठाण्यात ९ जणांवर गुन्हा दाखल केले असून आरोपी फरार आहेत. याबाबत जामखेड पोलिसांत कामगार तलाठी शिवाजी सखाराम हजारे सज्जा सोनेगाव, धनेगाव यांनी फिर्याद दिली.


धनेगाव शिवारातील खैरी नदीपात्रातून अवैध वाळूचा उपसा होत असल्याची खबर रविवार दि. ११ रोजी रात्री दहाच्या सुमारास मिळाली असता कामगार तलाठी शिवाजी हजारे, विकास मोराळे, प्रशांत कांबळे हे तिघे जण दोन मोटारसायकलवरून धनेगांव शिवारातील खैरी नदीपात्रात गेले. 

त्याठिकाणी अवैध वाळूचा उपसा करताना काही जण आढळले. त्यांना प्रतिबंध केला असता वाळूतस्कर महेश शिंदे (रा. चिंचपूर ता. परांडा जि.उस्मानाबाद), अमित देशमुख, दादा काळे, योगेश काळे (सर्व रा.धनेगाव) व इतर अनोळखी पाच जणांनी लाकडी दांडके घेऊन शिवीगाळ केली व तुम्ही येथून चालते व्हा नाहीतर तुमचे मुडदे पाडू अशी धमकी दिली.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.