उड्डाणपुलासाठी केलेला ठराव दिशाभूल करणारा - खा.दिलीप गांधी.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शहराच्या बाबतीत नेहमीच चर्चिला जाणारा उड्डाणपूल यासंदर्भात बोलताना खा.गांधी म्हणाले, तीनशे कोटी रुपयांच्या निधीतून या पुलाची निर्मिती होत आहे. यासाठी रॅम्पच्या ठिकाणी ही जमीन प्रामुख्याने सरकारी कार्यालयांची आहे. महापालिकेकडे आर्थिक टंचाई असेल तर त्यांनी अधिकाधिक जमीन राष्ट्रीय महामार्गाला देण्यासाठी प्रयत्न करायला हवा. 


Loading...
तसे मात्र शिवसेनेचे पदाधिकारी महापालिकेत करत नसल्याचे दिसत आहे. महापालिकेत शिवसेनेने महापालिकेची स्थिती बिकट असल्याचा ठराव मांडला आहे. हा ठराव चुकीचा आहे. यासंदर्भात आम्ही शासनाला कळविले आहे शहराच्या दृष्टिकोनातून उड्डाणपूल महत्त्वाचा आहे. 

पाच- सात कोटीचा विचार नव्हे असे सांगून गांधी म्हणाले, टीडीआर देऊन प्रश्न सुटत असेल तर वाद का घालावा मात्र समय सूचकता आणि दूरदृष्टीचा अभाव उड्डाणपुलासाठी प्रतिबंध ठरला असल्याची टीका गांधी यांनी यावेळी शिवसेना नेतृत्वावर केली उड्डाणपुलासाठी नुकताच केलेला ठराव दिशाभूल करणारा असून असे ठराव करण्याची सवय जुनी असल्याची टीकाही खासदार गांधी यांनी यावेळी केली.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.