आम आदमी पार्टीची युथ आघाडी कार्यकारिणी जाहीर.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नुकत्याच पुणे येथे आम आदमी पार्टी युथ आघाडीची युवा परिषद पार पडली. यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून युवकवर्ग परिषदेसाठी हजर झाला होता. यावेळी १९ जिल्ह्यांच्या आम आदमी पार्टी युथ आघाडीच्या महत्वपूर्ण पदावर नियुक्त्या करण्यात आल्या. 

Loading...
यामध्ये अहमदनगर जिल्ह्याच्या आप युवा आघाडी संयोजक पदी सुशीलकुमार शेळके यांची वर्णी लागली तर सहसंयोजक पदी प्रवीण मेमाणे,सचिव पदी महेश जगताप, कायदेशीर सल्लागार पदी सुनील आठरे खजिनदार पदी ज्ञानेश्वर आंबरे आणि प्रसिद्धी प्रमुख पदी बापू सुर्यवंशी यांची निवड करण्यात आली. 

आप युथ आघाडी चे महाराष्ट्र राज्य संयोजक अजिंक्य शिंदे असे म्हणाले कि या निवडीमागे कार्यकर्त्यांचा कामाप्रती आणि पक्षाविषयी प्रामाणिकपणा पाहिलाय आणि अनुभवला आहे. 

तर निवड झाल्यानंतर “आम्ही युवक आणि विद्यार्थी यांच्या प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच कार्यरत राहू” आणि ज्यांना विकासाच्या राजकारणावर विश्वास आहे त्यांनी आप पक्षामध्ये सामील व्हावे असे आव्हान यावेळी आम आदमी पार्टीची युथ आघाडीने केले. 

या परिषदेमध्ये प्रथम दिवशी आप महाराष्ट्र संयोजक सुधीर सावंत, सहसंयोजक रंगा राजुरे, सचिव सुभाष तंवर आणि आप युथ आघाडीचे महाराष्ट्र राज्य संयोजक अजिंक्य शिंदे आदींनी पक्ष बांधणी आणि संघटन या विषयी तर दुसऱ्या दिवशी कुमार सप्तर्षी, विश्वंभर चौधरी , विद्या बाळ आणि चंद्रकांत वानखेडे आदींनी सामाजिक व राजकीय आणि इतर विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.