कळसूबाई शिखरावर फडकणार सर्वात मोठा तिरंगा !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे व त्यांच्या 360 एक्सप्लोरर ग्रुपद्वारे कळसुबाईवर सर्वात मोठा तिरंगा फडकावुन होणार विश्वविक्रम याच बरोबरीने एवरेस्ट वीर आनंद बनसोडे यांच्या हस्ते भंडारदरा टुरीझमच्या लोगोच ही अनावरण होणार असल्याची माहीती भंडारदरा टुरीझमचे अध्यक्ष विजया व रवी ठोंबाडे यांनी दिली.


संपुर्ण भारत देशाला लोकप्रिय असणारा तिरंगा हा आता कळसूबाई शिखरावर डौलाने फडकताना दिसणार आहे.कळसूबाई शिखर हे समुद्रसपाटीपासून १६४६ उंची असलेल महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर असुन गिर्यारोहकांना कळसूबाई शिखर आव्हान कायम देत उभे आहे.


१५ आॅगस्ट या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधुन व निसर्ग पर्यटन व ट्रेकिंग यासाठी प्रेरणा मिळावी आणि पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी 360 एक्सप्लोरर चे एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांनी भारताच्या स्वातंत्रदिनी एक आगळी वेगळी मोहीम आखली असून कळसुबाई शिखरावर भारताचा सर्वात मोठा तिरंगा नेऊन जागतिक विश्वविक्रम करणार आहेत.
Loading...

या झेंड्याची उंची १२फुट आणी ६२मीटर असणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून या मोहिमेत शेकडो लोक सामील होणार असून भारताच्या व महाराष्ट्राच्या दृष्टीने अभिमानाचा क्षण असणार आहे.

याच बरोबर भंडारदरा टुरीझम या बेवसाईटच्या लोगोचे अनावरण ही कळसूबाई शिखरावर पार पडणार असल्याने पर्यटक व अकोले वासियांसाठी हि अभिमानाची बाब असल्याचे अकोले माझाचे सर्वेसर्वा रवी ठोंबाडे व विजया पाडेकर यांनी सांगितले अनेकांना या मोहिमेत सामील होण्यासाठी नुकतेच भंडारदरा टुरिझम चे रवी ठोंबाडे यांनी आवाहन केले आहे.

एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोरर च्या माध्यमातून जगभर मोहिमा करत असतात. एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांनी जगातील ४ खंडातील ४ सर्वोच्च शिखरांवर चढाई करून भारतासाठी अभिमानास्पद कामगिरी केली आहे. आतापर्यंत त्यांनी ५ पुस्तके लिहिली असून जगभर कॉर्पोरेट ट्रेनिंग व स्पीकर म्हणून लोकांना ते मार्गदर्शन देत असतात.

एवरेस्टविर आनंद बनसोडे व त्यांची ३६०एक्सप्लोरर टिम पहाटे पाच वाजता कळसूबाई शिखर चढाई साठी सुरवात करण्यात असुन त्यांच्या जागतिक विश्वविक्रम करण्याच्या या उपक्रमात महाराष्ट्रातुन अनेक पर्यटक,ट्रेकर हजेरी लावतील असा अंदाज आहे.यामुळे अकोले तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे.

दरवर्षी १५ ऑगस्ट व २६ जानेवारी रोजी कळसुबाई शिखर चढाई आखून हजारो लोकांना त्यांनी आतापर्यंत अकोले तालुक्यातील सौंदर्य दाखवले आहे. १५ ऑगस्ट रोजी रवी ठोंबाडे यांच्या भंडारदरा टुरिझम चे उदघाटन होणार असून याद्वारे अकोले तालुक्याची महती जगभर जाण्यास मदत होणार आहेत. एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे व रवी ठोंबाडे यांनी अकोल्याचे सौंदर्य जगभर कळण्यासाठी ही मोहीम हाती घेतली असून यातून अनेक स्थानिकांना रोजगार मिळेल असा विश्वास रवी ठोंबाडे व आनंद बनसोडे यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्राचे भुषण असलेले एव्हरेस्ट वीर आनंद बनसोडे यांच्या हस्ते भंडारदरा टुरिझम या पर्यटनास चालना देणाऱ्या ग्रुपचा चा लोगो व वेबसाईट महाराष्ट्रचे सर्वात उंच शिखरावर कळसूबाई वर भारताचा ध्वज फडकवत प्रदर्शित करण्यात येणार आहे . 

आंनद बनसोडे यांनी आजपर्यंत गिर्यारोहक म्हणुन जगभरात विविध ठिकाणी धाडसी गिर्यारोहक म्हणुन आपली ओळख निर्माण केलेली असुन आनंद बनसोडे यांच्या हस्ते या भंडारदरा टुरीझम चा लोगो प्रदर्शित करावा, अशी अनेक मान्यवरांनी पसंती दर्शवली होती. आनंद बनसोडे यांच्या नावावर खुपसारे विश्व रेकॉर्ड आहेत. त्यांच्या हस्ते भंडारदरा टुरीझम लोगो प्रदर्शित होणार असल्याने अकोलेकरांच्या दृष्टीने ही अभिमानाची बाब आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.