आरक्षणासाठी अहमदनगर तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- सकल मराठा समाजाने क्रांतिदिनाच्या आंदोलनानंतर आरक्षणाच्या मुख्य मागणीसह इतर मागण्यांसाठी आता अहमदनगर तहसील कार्यालयासमोर साखळी पद्धतीने बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आहे. या धरणे आंदोलनात एक वार्ड, एक गाव' असा समावेश असल्याची माहिती सकल मराठा क्रांती मोर्चाच्या आयोजकांच्यावतीने देण्यात आली. 


Loading...
यावेळी संजीव भोर, अजय बारस्कर, बाळासाहेब पवार, संजय अनभुले, दिंगबर भोसले, राम पठारे, आशा निंबाळकर, आशा गायकवाड, उषा ओझा, सुनील बोठे, स्वप्नील पाठक, गणेश गोरे, तन्मय गांगर्डे, अच्युत गाडे, प्रमोद भासार, राम झिने, विशाल म्हस्के, वैभव शिंदे, आदिनाथ चंद्रे, बापू भोसले, श्रीपाद दगडे, अनिल शिंदे आदी सकल मराठा बांधव उपस्थित होते.

क्रांतिदिनी महाराष्ट्र बंदची हाक देत सकल मराठा क्रांती मोर्चाने संप पुकारला होता. या संपाला जिल्हाभर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. काही ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण मिळाले मात्र, जिल्हाभर कडकडीत बंद पाळण्यात आला. त्यानंतर मराठा क्रांती मार्चाने जिल्हाभर तहसील कार्यालयावर साखळी पद्धतीचे बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. 


नगर तहसील कार्यालयात कालपासून सुरू करण्यात आलेल्या साखळी उपोषणात एक मराठा लाख मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय, अशा घोषणा देत निदर्शने केली. मराठा क्रांती मोर्चाने सुरू केलेल्या आंदोलनात एक वार्ड एक गाव अशा पद्धतीने आंदोलनास सुरूवात केली. उद्या या साखळी उपोषणात निंबळक गाव व पाइपलाइन रोड येथील वार्ड नं. ३ चा सहभाग आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.