राज्यात दमदार पावसाची शक्यता


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :बंगालचा उपसागर व अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मान्सूनचा ट्रफ राज्याच्या जवळ येण्याचीही शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात द्रोणीय स्थिती निर्माण होणार असल्याने मागील काही दिवस दडी मारलेला पाऊस पुढील दोन दिवसांत पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. 


Loading...
यामुळे पुढील दोन ते तीन दिवसांत राज्यात ठिकठिकाणी दमदार पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. दरम्यान, विदर्भात तुरळक ठिकाणी शनिवारी मुसळधार पाऊस पडला, तर कोकण, मध्य महाराष्ट्रात ब‍ऱ्याच ठिकाणी, तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडला. 

पुढील २४ तासांत मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. मागील २४ तासांत ठाणे ३० मि.मी., मुंबई १० मि.मी., महाबळेश्‍वर ६० मि.मी., ताम्हिणी १०० मि.मी., कोयना ५० मि.मी., लोणावळा २० मि.मी. पावसाची नोंद झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------


Powered by Blogger.