खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत राहुरीत शेतकरी मेळाव्याचे आयोजन.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत २४ ऑगस्ट रोजी राहुरी येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी दिली.
Loading...

राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्याच दिवशी ते दुपारी राहुरी येथे येणार आहेत. दौऱ्याचे नियोजन करण्यासाठी काल तालुक्यातील राष्ट्रवादीच्या निवडक कार्यकर्त्यांची बैठक प्राजक्त तनपुरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. 


हा दौरा यशस्वी करण्यासाठी आजपासून राष्ट्रवादीचे तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य शिवाजी गाडे, बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अजीत कदम, प्रेरणा ग्रुपचे संस्थापक सुरेश वाबळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दौरा यशस्वी करण्यासाठी राहुरी, नगर, पाथर्डी मतदारसंघातील नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन तनपुरे यांनी केले आहे.

बैठकीला के. एम. पानसरे, रखमाजी जाधव, अप्पासाहेब जाधव, कचरू चितळकर, रवींद्र आढाव, नितिन बाफना, प्रभाकर गाडे, धीरज पानसंबळ, सुरेश निमसे, दत्ता कवाणे, सुनील मोरे, विजय आंबेकर, बाळासाहेब पेरणे, सुनील अडसुरे, गोरक्षनाथ खडके, नारायण सोनवणे, अशोक कोहकडे, श्रीराम गाडे, वाघमारे महाराज, बाळासाहेब खुले, ज्ञानेश्वर खुले, आदिनाथ तनपुरे यांच्यासह तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.