नोकरी शोधणाऱ्यांसाठी एक खुश खबर


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पुढील तीन महिन्यात तब्बल 4,000 पदवीधर फ्रेशर्सना नोकऱ्या देणार असल्याचे संकेत टेक महिंद्रा ने रविवारी दिले असून यापुढे नियुक्त्यांवर लक्ष केंद्रीत करणार असल्याचे असल्याचे टेक महिंद्राचे मुख्य वित्तीय अधिकारी मनोज भट यांनी स्पष्ट केले आहे. 

Loading...
कंपनीने या वर्षात 1800 फ्रेशर्सची नियुक्ति केली असल्याचेही त्यांनी बोलताना सांगितले. तुर्तास आपल्याजवळ निश्चित आकडेवारी उपलब्ध नसली तरी, येत्या तीन महिन्यांत आम्ही किमान चार हजार नोकऱ्या देणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईच्या कंपनीत कर्मचाऱ्यांची संख्या जून 2018 पर्यंत 1 लाख 13 हजार 552 होती. गेल्या तीन महिन्यांत त्यात आणखी 745 ने वाढ झाली आहे.

पुनरावलोकनांनंतर तीन महिन्यात कंपनीच्यासॉफ्टवेयर विभागात 72462, बीपीओ मध्ये 34,700 आणि सेल्स अँड सपोर्ट मध्ये 6,390 लोग कार्यरत आहेत. कर्मचाऱ्यांच्या नोकरी सोडून जाण्याच्या प्रवृत्तीबाबत बोलतांना ते म्हणाले की, उत्तम गुण असलेल्यांच्या जाण्याबाबत आम्ही चिंतीत आहोत, पण त्याचा कंपनीच्या कामावर अजिबात प्रभाव पडत नसल्याचे त्यांनी सांगितले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.