अहमदनगर जिल्ह्यातील २३८ ग्रामपंचायती झाल्या हायटेक


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- माहिती तंत्रज्ञानाच्या युगात ग्रामीण जनता मागे राहू नये, यासाठी जिल्ह्यातील राहुरी, जामखेड, शेवगाव या तालुक्यांतील २३८ ग्रामपंचायती नॅशनल आॅप्टीकल फायबर नेटवर्क (एनओएफएन) जोडल्या गेल्या आहेत, अशी माहिती बीएसएनएलचे महाप्रबंधक अजातशत्रू सोमाणी यांनी दिली. बीएसएनएलच्या सेवासंदर्भात माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत सोमाणी बोलत होते.
Loading...

या वेळी उपमहाप्रबंधक एम. यू. खान, विपणन अिभयंता डी. जी. भाेर उपस्थित होते. सोमाणी म्हणाले, देशातील सर्व ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबर्स नेटवर्कने ब्रॉडबॅंड इंटरनेट कनेक्शनद्वारे जोडण्याचा उपक्रम केंद्र सरकारने हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत राहुरी, जामखेड, शेवगाव या तालुक्यांतील २३८ ग्रामपंचायती या ब्राॅड बँडने जोडल्या गेल्या आहेत. 


उर्वरित तालुक्यातील ग्रामपंचायती नॅशनल आॅप्टीकल फायबर नेटवर्कने जोडण्यासाठी राज्य सरकार ही योजना राबवणार आहे. ग्रामपंचायतींमध्ये ब्रॉड ब्रँडची जोडणी झाल्यानंतर ग्रामपंचायतींचे कामकाज आणखी गतिमान, पारदर्शक व लोकाभिमुख होणार आहे. ग्रामीण भागापर्यंत इंटरनेट व दूरसंचार सेवा पोहोचवण्यासाठी जिल्ह्यात ११० वायफाय हॉटस्पॉट स्थळे सुरू होणार आहेत. 

त्यापैकी शाळा, महािवद्यालये, मोठी हॉटेल अशा २४ ठिकाणी हॉटस्पॉट सुरू झालेले आहेत. यात ग्राहकांना महिन्याला ४ जीबी डाटा माेफत वापरता येईल. मोबाइल नेटवर्क सुधारण्यासाठी जिल्ह्यात नवीन ३०७ मोबाइल टॉवर उभारले जातील, अशी माहिती सोमाणी यांनी दिली.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.