बंद घराचे कुलूप तोडून दीड लाखाची चोरी.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राहाता तालुक्यातील लोणी बुद्रूक येथील राजहंस वसाहतीमधील बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी दीड लाखांचा ऐवज लांबवला. नंतर चोरट्यांनी लोणी पेट्रोलपंपाशेजारी असलेली चार-पाच दुकाने फोडली. चोरीच्या घटना गुरूवारी मध्यरात्री झाल्या.चोरट्यांनी आईस्क्रीम पार्लर फोडून मद्यात शीतपेय टाकून प्राशन केल्याचे पोलिसांना आढळले.
Loading...

राजहंस वसाहतीतील पुष्पा रामराव माताडे यांच्या बंगल्याचे कुलूप तोडून रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने असा सुमारे दीड लाखांचा ऐवज चोरून नेला. शेजारी असलेले बाळासाहेब जाधव यांच्या बंद घराचे कुलूप तोडून सुमारे साडेतीन लाखांचा ऐवज चोरट्यांनी पंधरा दिवसापूर्वी लांबवला होता. तपास लागण्यापूर्वीच पुन्हा या वसाहतीला चोरांनी लक्ष्य केले.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.