जामखेड शहरासाठी शंभर कोटी खर्चाची पाणीयोजना राबवणार.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- जामखेड नगरपालिकेचे नूतन नगराध्यक्ष निखिल घायतडक व उपनगराध्यक्ष शाकीरभाई खान यांनी आज़ आपला पद्भार स्वीकारला. या वेळी नगराध्यक्ष निखिल घायतडक म्हणाले, मी सर्वसामान्य कुटुंबातील असून, मला नगराध्यक्ष होण्याची संधी ही पालकमंत्री प्रा. राम शिंदे व सर्व नगरसेवकांमुळे मिळाली आहे. 


Loading...
या संधीचे सोने करून आपण शहरातील विविध विकासकाम मार्गी लावू. पालकमंत्री शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या विशेष प्रयत्नांतून जामखेड शहरातील विविध विकासकामांसाठी कोटयवधी रुपयांचा निधी मंजूर होत आहे. खर्डा चौक ते तपनेश्वर रोडचे काम थोडयाच दिवसांत सुरू केले ज़ाईल. 

जामखेड शहरातील नागरिकांना स्वच्छ व फिल्टरयुक्त पाणी मिळण्यासाठी 100 कोटी रुपये खर्चाची उजणी येथून पाणीपुरवठा योजना लवकरच मंजूर होणार आहे. जामखेड शहरातील विविध विकासकामांसाठी ना. शिंदे यांनी 10 कोटी रुपयांचा निधी तत्काळ मंजूर केला आहे. जामखेड शहर हे स्वच्छ व सुंदर करण्यासाठी प्रयत्न केले ज़ातील. ना. शिंदे व नगरसेवकांनी माझ्यावर टाकलेल्या विश्वासा तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही नगराध्यक्ष निखिल घायतडक यांनी दिली. 

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------Powered by Blogger.