भानुदास कोतकरच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- केडगाव दुहेरी हत्याकांडात गजाआड असलेल्या भानुदास एकनाथ कोतकर याच्या जामीनअर्जावरील निर्णय पुन्हा लांबणीवर गेला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद झाला होता. कोतकरच्या वकिलाने शुक्रवारी जामीन मिळण्याच्या पुष्ट्यर्थ आणखी काही न्यायनिवाडे सादर केले. त्यांचा अभ्यास करुन म्हणणे मांडण्यासाठी सरकार पक्षाने मुदत घेतली. 


Loading...
वैद्यकीय कारणास्तव आपल्याला जामीन मिळावा, असा अर्ज त्याच्या वतीने न्यायालयात सादर करण्यात आला आहे. दोन्ही बाजूंच्या वकिलांनी आपले म्हणणे सादर केले होते. त्यामुळे जामीन मिळणार की, नाही, याबद्दल उत्सुकता होती. 

शुक्रवारी कोतकरच्या वकिलाने जामीन मिळण्याच्या युक्तिवादानंतर काही न्यायनिवाडे सादर केले. त्यावर सरकारी वकील अॅड. केदार केसकर यांनी सादर झालेले न्यायनिवाडे वाचून आपले म्हणणे सादर करण्यासाठी वेळ हवा असल्याचे सांगितले. न्यायालयाने सरकार पक्षाला मुदत दिली. पुढील सुनावणी १४ ऑगस्टला होणार आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.