नगर-मनमाड महामार्गावरील अपघातात वृद्ध महिला ठार


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर-मनमाड महामार्गावरील कोकणठाण शिवारातील आत्‍मा मालिक हॉस्पिटलसमोर रस्‍ता ओलांडताना अज्ञात वाहनाने दिलेल्‍या धडकेत प्रमिला कृष्णकुमार शुक्‍ला (वय ७७, रा. ए. ३/ १५९ अरेरा कॉलनी, भोपाळ, मध्यप्रदेश) या वृध्द महिलेचा मृत्‍यू झाला. वाहनासह वाहनचालकाने मात्र पोबारा केला.  


Loading...
याप्रकरणी संध्या जोतिर्मय मिश्रा (वय ५१, रा. ए ३/ १५९ अरेरा कॉलनी, भोपाळ, मध्यप्रदेश) सध्या राहणार आत्‍मा मालिक हाईट्स रूम नंबर २२५ यांनी कोपरगाव शहर पोलिसात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात वाहन चालकांविरोधात गु.र.नं. फस्‍ट ५३/२०१८ भादंवी कलम ३०४ अ २७९ मो.वा.का.क. १८४, १३४ अ,ब १७७ प्रमाणे गुन्‍हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.शैलेंद्र ससाणे करीत आहेत.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.