बकरी ईदला राज्यात बॉम्बस्फोट घडविण्याचा कट्टरवाद्यांचा कट


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- येत्या बकरी ईदला राज्यातील धार्मिक स्थळांमध्ये बॉम्बस्फोट घडवून मोठा हिंसाचार आणि धार्मिक दंगली घडविण्याचा कट्टरवाद्यांचा कट असल्याचे नालासोपारात सापडलेल्या स्फोटकांमुळे स्पष्टपणे दिसून येत आहे.


Loading...
आता तरी राज्य सरकार सनातन आणि हिंदू जनजागृती समितीसारख्या विघातक संघटनांवर बंदी घालण्यासंदर्भात केंद्राकडे मागणी करणार का? अशी विचारणा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

नालासोपारा येथे बॉम्ब आणि स्फोटकांचा साठा आढळून आल्यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना ना. विखे बोलत होते. याप्रकरणी एटीएसने ताब्यात घेतलेल्या व सनातन आणि हिंदू जनजागृती समितीशी संबंधित तरुणावर पूर्वीपासून दंगलींचे गुन्हे दाखल आहेत. 


नेमका त्याच्याकडे बॉम्बचा साठा सापडणे आणि त्याच्या बचावार्थ हिंदू जनजागृती समितीने हा 'मालेगाव पार्ट २' असल्याचे जाहीर करणे, ही बाब धार्मिक स्थळांमध्ये बॉम्बस्फोट घडविण्याचे कारस्थान शिजत असल्याचा स्पष्ट संकेत आहे. या समितीने 'मालेगाव पार्ट २' हाच शब्द का निवडावा? असा प्रश्नही विखे पाटील यांनी उपस्थित केला आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.