मराठे हिंसक नाहीत; सीआयडी चौकशी करा


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :मराठा समाजाने न्याय हक्कासाठी देशात आणि बाहेर अगदी शांततेत लाखोंचे मोर्चे काढले आहेत. त्यात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. गुरुवारी (दि.९) पुकारलेल्या बंददरम्यान काहींनी वाळूज भागात जाळपोळ, खासगी मालमत्तांचे नुकसान केले. याचा मराठा क्रांती मोर्चाशी संबंध नसून मराठे हिंसक नाहीत, असा दावा करत याप्रकरणाची सीआयडी चौकशी व्हावी, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाने पत्रकार परिषदेत केली. 
Loading...

मराठा आरक्षणाच्या प्रमुख मागणीसाठी राज्यभर मराठा क्रांती ठोक आंदोलन करण्यात येत आहे. गुरुवारी पुकारलेल्या बंददरम्यान काही समाजकंटकांनी वाळूजमधील औद्योगिक वसाहतीत सार्वजनिक तसेच खासगी मालमत्तांचे नुकसान केले. उद्योजकांकडून याप्रकरणी मराठा क्रांती मोर्चावर आरोप करण्यात येत आहेत. 


उद्योजकांच्या आरोपाला उत्तर देण्यासाठी शुक्रवारी (दि. १०) मराठा क्रांती मोर्चाकडून आयोजित पत्रकारपरिषदेत समन्वयक विनोद पाटील यांनी सर्व आरोप खोडून काढत मराठा समाज आपल्या न्याय हक्कासाठी लढत आहे. मूक मोर्चे, ठोक मोर्चे झाल्यानंतर आता ठिय्या आंदोलन सुरू आहे. १५ ऑगस्टला आम्ही चूल बंद आंदोलन करणार आहोत. जोपर्यंत सरकार आमच्या मागण्या पूर्ण करत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.