जामखेड मध्ये जिल्हा बँकेची शाखा फोडण्याचा प्रयत्न.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- जामखेड तालुक्यातील अरणगाव येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा फोडण्याचा प्रयत्न चोरटयांनी केला. मात्र, बँकेचा सायरन वाजल्याने चोरटे पळून गेले. दुसऱ्या एका घटनेत त्याच दिवशी जामखेड येथील नगर रोडवरील बिअर शॉपीच्या दुकानाचे शटर तोडून अज्ञात चोरटयांनी ७४ हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. 

Loading...
याबाबत पाोलिसांंकडून मिळालेली माहिती अशी- अरणगाव येथे अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेची शाखा आहे. दि. ३० रोजी सायं. बँकेचे कामकाज संपल्यानंतर बँक मॅनेजर व कर्मचारी बँक बंद करून घरी गेले. दि. ३१ रोजी पहाटे सव्वातीन वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरटयांनी बँकेचे समोरील बाजूचे शटरचे कुलूप तोडून सीसीटीव्हीचे कॅमेरे तोडून टाकले व आत जाऊन बँकेची तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला. 

मात्र, या वेळी बँकेचा सायरन वाजल्यामुळे चोरटयांनी त्या ठिकाणाहून काढता पाय काढला. सायरन वाजल्याने आजुबाजच्या ग्रामस्थांनी बँकेकडे धाव घेतली असता, चोरटयांनी बँक फोडल्याचे लक्षात आले. या प्रकरणी बँकेचे मॅनेजर पंडित रंगनाथ सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरटयांविरोधात जामखेड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दुसऱ्या घटनेत दि. ३१ रोजी पहाटे पावणेचारच्या सुमारास फिर्यादी युवराज पोकळे यांचे शहरातील नगररोडवर असलेल्या राजबिअर शॉपीचे शटर उचकटून चोरटयांनी ७४ हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. याप्रकरणी बिअर शॉपीचे मालक युवराज रामचंद्र पोकळे, रा. पोकळे वस्ती, यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चार चोरटयांविरोधात जामखेड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोना. भागवत हे करत आहेत.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.