अकोले तालुक्यातील आदिवासी आश्रमशाळेतील ५५ विद्यार्थ्यांना गॅस्ट्रोची लागण

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :अकोले तालुक्यातील पिंपळदरी येथील आदिवाशी आश्रमशाळा व रामकृष्णहरी वारकरी शिक्षण संस्थेेच्या विद्यार्थ्यांना सोमवारी दुपारनंतर गॅस्ट्रो सदृश्य आजाराची लागण झाली. जवळपास ५५ विद्यार्थ्यांना याची लक्षणे दिसत आहे.


Loading...
या सर्वांना प्राथमिक उपचारासाठी तातडीने घारगाव (ता. संगमनेर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. त्यातील अत्यव्यस्त असणाऱ्या ९ मुलांना पुढील उपचारासाठी लोणी प्रवरा येथे रात्रीच्या सुमारास हलविण्यात आले आहे. उर्वरित विद्यार्थ्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.