दोन महिन्यानंतर डाॅ. भिसे यांना जामीन.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त चोंडी येथे आयोजित कार्यक्रमात आरक्षणाच्या मागणीवरून झालेल्या गोंधळानंतर कार्यकर्त्यांसह डाॅ. ईद्रकुमार भिसे यांना अटक करण्यात आली होती. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने त्यांचा जामीन अर्ज मंजूर केला. 


Loading...
३१ मे रोजी झालेल्या गोंधळामुळे पोलिसांनी डाॅ. भिसेंसह १६ जणांवर गुन्हा दाखल केले होते. बाकीच्या पंधरा जणांना आधीच जामीन मंजूर झाला आहे. डाॅ भिसे यांचा जामीन अर्ज मात्र न्यायालयाने फेटाळला होता. जामीन मिळावा, यासाठी चौंडी, जामखेड येथे आंदोलन व उपोषण करण्यात आले होते. 

तब्बल ५९ दिवसांनी डाॅ भिसे यांचा जामीन अर्ज खंडपीठात मंजूर झाला. न्यायमूर्ती संगीतराव पाटील यांनी जामीन अर्ज मंजूर केला. भिसे यांच्यावतीनेन अॅड. सुदर्शन साळुंके व अॅड. कविता नरोटे यांनी बाजू मांडली.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.