दशक्रिया विधीसाठी ज़ाताना जीप पलटी झाल्याने दहाजण जखमी


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पाथर्डी तालुक्यातील ढाकणवाडी शिवारात खासगी जीपला अपघात होऊन दहा ते बाराजण जखमी झाले. तालुक्यातील चिंचपूर पांगूळजवळ असलेल्या ढाकणवाडी शिवारात जीप पलटी होऊन दहा ते बाराजण जखमी झाले असून, सहा गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी नगर येथे हलवण्यात आले आहे. जखमींमध्ये महिला आणि पुरुषांचा समावेश आहे. 

Loading...
किरकोळ जखमींना चिंचपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. इतर सात जखमींना पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले, त्यापैकी सहा जणांना नगर येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आले.

 वडगाव, ढाकणवाडीतून दहा ते बारा ग्रामस्थ खासगी जीपने दशक्रियाविधीसाठी चालले असताना ढाकणवाडी शिवारातील धोकादायक वळणावर गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने जीप पलटी होऊन अपघात झाला. येथे अतिशय धोकादायक आणि अरुंद रस्ता आहे. रस्त्याच्या बाजूने व मध्ये खड्डे पडलेले आहेत. 

अपघातात सिंधूबाई नागरगोजे (वय ५० वर्षे), कविता नागरगोजे (वय -४० वर्षे), इंदुबाई नागरगोजे (वय- ६५ वर्षे), जनाबाई नागरगोजे (वय- ६० वर्षे), विठ्ठल नागरगोजे (वय- ४० वर्षे), कौशल्य ढाकणे सर्व रा. वडगाव यांना पुढील उपचाराकरिता नगर येथील हॉस्पिटलमध्ये दाखल केले. बबन नागरगोजे (वय ४० वर्षे) हे पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. घटनेची माहिती मिळताच परिसरातील स्थानिकांनी जखमी प्रवाशांना गाडीतून काढून उपचारासाठी मदत केली. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.