महिलेच्या खुनाची सीआयडी चौकशी करण्याची मागणी

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- कर्जत तालुक्यातील मौजे नागलवाडी येथील मातंग समाजातील महिलेच्या खुनाची सीआयडी चौकशी करुन यामधील आरोपींना तातडीने अटक करण्याच्या मागणीसाठी लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने करण्यात आली. 


यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनिल शिंदे, साहेबराव पाचारणे, विलास बोरुडे, अरुण बोरुडे, राजू रोकडे, संतोष शिंदे, वर्षा डाडर, सुनिल उमाप, बाबासाहेब डाडर, दिलीप केंदळे, माणिकराव लोखंडे, तानाजी डाडर, ज्ञानेश्‍वर जगधणे, पावलस पवार, सुनिल सकट, पोपट पाथरे, अंकुश डाडर, नागेश डाडर, उमेश साठे, भारत पवार आदींसह मृत महिलेचे कुटुंबीय व संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Loading...
दि.31 जुलै रोजी श्रीगोंदा तालुक्यातील औटेवाडी येथील शेता जवळील तळ्यात अनोळखी महिलेचा मृतदेह सापडला. या मृतदेहाच्या गळ्यावर, उजव्या हातावर तसेच डाव्या पंज्यावर धारदार शस्त्राने हल्ला झाल्याचे वैद्यकिय अधिकारी यांनी स्पष्ट केले. यानुसार सदर महिलेचा खुन झाल्याचे निदर्शनास आले. 

या मृतदेहाची ओळख पटल्यानंतर कविता उर्फ मंकाबाई डाडर (रा. मौजे नागलवाडी, ता.कर्जत वय 35) या महिलेचा खुन झाल्याचे निदर्शनास आले. सदर महिलेस नागलवाडी येथून घेऊन जाऊन खून करण्यात आला आहे. या खुन प्रकरणाचा योग्य दिशेने तपास करण्यात आलेला नाही. 

रोपींमध्ये धनदांडगे व्यक्तींचा समावेश असून, यामधील मुख्यसूत्रधार मोकाट फिरत आहे. शवविच्छेदन नंतर महिलेचा मृतदेह त्यांच्या नातेवाईकांना देण्यात आला नाही. त्या प्रेताचे अंतिमसंस्कार झाल्याचे देखील तीच्या कुटुंबीयांना माहिती पडू दिले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

या खुनाची सीआयडी मार्फत चौकशी व्हावी, संशयीत आरोपींची नार्कोटेस्ट करण्यात यावी, आरोपींवर अ‍ॅट्रोसिटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल व्हावा, मृत महिलेच्या कुटुंबीयांना शासनाकडून 10 लाख रुपयाची आर्थिक मदत मिळण्याची मागणी लहुजी शक्ती सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. 

या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांना देण्यात आले. या मागणीची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.