सत्ता घालवली, पण श्रेय घेण्याची सवय गेली नाही.- आ.राहुल जगताप


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- श्रीगोदे मुख्यमंत्री ग्रामसडक योजना व मुख्यमंत्री संशोधन विकास योजनेंतर्गत श्रीगोंदे व नगर तालुक्यातील रस्त्यांसाठी २८ कोटी ३३ लाख ६० हजारांचा निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती आमदार राहुल जगताप यांनी दिली. आमदार जगताप म्हणाले, मी सर्व ग्रामस्थांशी चर्चा करुन कामे मंजूर केली आहेत. कोणीही या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करु नये. 

काही लोकांना तशी सवय आहे. लोकांनी सत्ता घालवली, मात्र त्यांची ही सवय जात नाही. त्यांना सत्ता दिली असताना जे जमले नाही, ती विकासाची कामे मी या पाच वर्षांत पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे, असे सांगत त्यांनी माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचा नामोल्लेख न करता टीका केली. 


Loading...

मंजूर रस्त्यांत घोगरगाव ते बांगर्डे रस्ता २ कोटी ३१ लाख, ढवळेवाडी रस्ता ४ कोटी १५ लाख, कोळगाव ते गुंडेगाव रस्ता १ कोटी ६८ लाख, बेलवंडी, लोणी व्यंकनाथ ते शिरसगाव हद्द रस्ता ४ कोटी ३० लाख, गणेशवाडी ते हनुमंतवाडी रस्ता २ कोटी ६४ लाख, वडगाव तांदळी साकत ते मांडवे रस्ता २ कोटी ३१ लाख, वडगाव तांदळी ते कामठी रस्ता २ कोटी २५ लाख, श्रीगोंदे ते टाकळी कडेवळीत रस्ता ६ कोटी ३५ लाख ४१ हजार, श्रीगोंदे ते आढळगाव रस्ता नुतनीकरण २ कोटी ७६ लाख ३७ हजार निधी मंजूर झाला आहे, असे त्यांनी सांगितले.


मी आश्वासने देत नाही. प्रत्यक्ष कामावर माझा भर आहे. मी इतरांप्रमाणे नुसत्याच कोटीच्या गप्पा मारत नाही, तर प्रत्यक्ष कामे मंजूर झाल्यावरच बोलतो. गेली ३० ते ३५ वर्षे जे रस्ते पक्के झाले नाहीत, ते करण्याचे काम मी करत आहे, असे आमदार जगताप म्हणाले.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.