माहिती अधिकार कार्यकर्त्यास मारहाण


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :कोपरगाव तालुक्यातील मुर्शतपूर येथील माहिती अधिकार कार्यकर्ते दिलीप नाना शिंदे (४७ वर्षे) यांनी रेशनकार्ड व इतर माहिती माहितीच्या अधिकारात मागवल्याचा राग आल्याने माजी सरपंच व त्याच्या मुलांनी शिंदे यांना दांडक्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केले. 


Loading...
दिलीप भानुदास शिंदे, अनिकेत दिलीप शिंदे, अभिजित दिलीप शिंदे, सौरभ दिलीप शिंदे व इतर ३ ते ४ जणांनी दिलीप नाना शिंदे यांना रस्त्यात अडवून काठीने मारहाण केली. त्यांना कोठारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या उजव्या हातात, तसेच दोन्ही पायांत रॉड टाकण्यात आले आहेत. बुधवारी त्यांच्या जबाबावरून शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.