फुकटचे श्रेय लाटण्याऐवजी केलेल्या कामांची माहिती आमदारांनी द्यावी - माजीमंत्री पाचपुते.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- आपण चार वर्षांत काय विकासकामे केली याची माहिती आमदाराने जनतेला द्यायला हवी, पण तसे न करता आम्ही सरकारच्या माध्यमातून मंजूर केलेल्या कामाच्या नकला काढून पेपरबाजी करून श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न ते करतात, अशी टीका माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी बुधवारी आमदार राहुल जगताप यांचे नाव न घेता केली. 

Loading...
साळवणदेवी भिंगानमार्गे टाकळी कडेवळीत या रस्त्यासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत साडेआठ किलोमीटरसाठी ६ कोटी ३२ लाख रुपये पाचपुते यांच्या प्रयत्नांतून मंजूर झाले. या कामाचा प्रारंभ टाकळी कडेवळीत पाचपुते यांच्या हस्ते झाला. 

या वेळी ते म्हणाले, लोकांची दिशाभूल थांबवून विकासकामांकडे लक्ष देण्याची खरी गरज आहे. जनतेने आपल्याला निवडून दिले आहे. जनतेसाठी ४ वर्षांत किती निधी आणून किती कामे केली, याचा हिशेब जनतेला द्या. मात्र, तसे न करता केवळ श्रेय लाटण्याचा प्रयत्न होत आहे. आता तालुक्यात मोठ्या प्रमाणात सौरऊर्जा प्रकल्प मंजूर झाले असून सर्वात मोठा प्रकल्प टाकळी येथे होणार असल्याने लवकरच हे गाव जगाच्या नकाशात दिसेल, असे पाचपुते म्हणाले. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
-------------------------------
Powered by Blogger.