मराठा आरक्षणासाठी आत्महत्येची धमकी; माजी सरपंचास अटक.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करणार असल्याची पोस्ट सोशल मीडिया टाकणाऱ्या नगर तालुक्यातील माजी सरपंचांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. भाऊसाहेब घाडगे असे या माजी सरपंचांचे नाव आहे. ते वडगाव तांदळी येथील माजी सरपंच आहेत. 
Loading...

मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही तर मी रात्री बाराच्या सुमारास आत्महत्या करीन अशी पोस्ट घाटगे यांनी व्हाटस अॅप ग्रुपवर टाकली. त्यानंतर ग्रुपवरील सदस्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. 


त्यानंतर काही वेळातच भाऊसाहेब दुचाकीवरून रुई छत्तीशीच्या दिशेने गेले तोपर्यंत त्यांच्या शोधासाठी त्या परिसरातील ग्रामस्थ धावपळ करू लागले. त्यानंतर पोलीस, महसूल प्रशासनाने धावपळ करत त्यांना ताब्यात घेतले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.