मराठा आरक्षणाला मुस्लिम व धनगर समाजाचा पाठिंबा !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पाथर्डी तालुक्यातील शिराळ येथे सकल मराठा समाजाच्या वतीने आरक्षणाच्या मागणीसाठी शिराळ ग्रामस्थांच्या वतीने चिचोंडी -पांढरीपूल रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. 

या वेळी मराठा समाजाच्या वतीने ज्येष्ठनेते छबुराव मुळे सर यांनी आंदोलनकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले, हे आंदोलन शांततेने करण्यात येईल तसेच कायद्याच्या चौकटीत बसवून मराठा आरक्षण त्वरित जाहीर करावे, अशी मागणी केली. मुस्लिम समाजाच्या वतीनेदेखील मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यात येत असल्याचे अबिरभाई शेख गुरुजी यांनी सांगितले. या बंदमध्ये वैभव खलाटे, शिराळ सोसायटीचे चेअरमन रामदास गोरे, पंढरीनाथ तुपे, संजय गोरे, हणुमंत घोरपडे, रवींद्र कराळे, मिठू मुळे, मोहन गोरे, महेश चेमटे, भागवत रोमन, पिनू मुळे, दीपक मुळे यांनी आंदोलनकर्त्यांना मार्गदर्शन केले.


Loading...
या वेळी गावातील सर्व व्यवहार कडकडीत बंद ठेवण्यात आले होते. तसेच तरुणांच्या एक मराठा, लाख मराठा या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. या वेळी पाथर्डी पोलिसांची गाडी तरुणांनी आडवून धरल्यामुळे वातावरण तणावपूर्ण झाले होते. 

गुणवत्ता असूनदेखील मराठा समाजाच्या तरुणांना आरक्षण नसल्याने अनेक तरुणांना उच्च शिक्षण मिळत नाही, नोकरी मिळत नाही, त्यामुळे मराठा समाजाचा तरुण हतबल झाला आहे.यामुळे सरकारने मराठा समाज़ाला त्वरित आरक्षण द्यावे, अशी मागणी खलाटे यांनी केली. 

संतोष गरुड यांनी सांगितले की, सरकारी कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य होतात तसेच आमदार- खासदारांचा पगार एका दिवसात वाढतो, मग आमच्या समाजाला आरक्षण का मिळत नाही, असा प्रश्न उपस्थित केला. 


या वेळी गावातील तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी आंदोलकांनी बंदोबस्तासाठी आलेली पाथर्डी पोलिसांची जीप आडवून पोलीस गाडीसमोर झोपून आरक्षणाची मागणी लावून धरली. उशिरा पोलीस गाडी आंदोलकांच्या कचाटयातून बाहेर काढण्यात आली.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.