सुरक्षेच्या दृष्टीकोनातून राज्यात अनेक ठिकाणी इंटरनेट सेवा बंद


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून सकल मराठा समाजाकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. राज्यात अनेक ठिकाणी आंदोलनाला सुरुवात झाली आहे. 

Loading...
दरम्यान सुरक्षेच्या दृष्टीकोनातून राज्यात अनेक ठिकाणी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. पंढरपूर, सोलापूर, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. औरंगाबादमध्येही काही मोबाइल कंपन्यांची इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

पुण्यातही इंटरनेट सेवा बंद करण्यात आली असून यामध्ये सात जिल्ह्यांचा समावेश आहे. सुरक्षेच्या दृष्टीने शिरुर, खेड, बारामती, जुन्नर, मावळ, दौंड आणि भोर या तालुक्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.