Live Updates : महाराष्ट्र बंद - #मराठा आरक्षण आंदोलन.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. सकल मराठा समाजाने महाराष्ट्र बंदची हाक दिली असून मराठा आंदोलकांकडून अहमदनगर शहर व जिल्हाभरात बंद पाळण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली असून  अनेक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील एसटीची वाहतूक पूर्णपणे बंद असून ;  सकाळपासून जिल्ह्यातील अकरा आगारांतून एकही बस सुटली नाही.

मुस्लिम समाजाच्या वतीने मराठा आंदोलकांना अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे आंदोलनात सहभागी

आंदोलनावर ड्रोन कॅमेराची नजर


----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.