१५ ऑगस्ट - भारतीय स्वातंत्र्य दिन.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- ब्रिटिश साम्राज्यापासून दिनांक १५ ऑगस्ट इ.स. १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन' दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. हा भारतातील एक राष्ट्रीय सण आहे. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज उभारला जातो. देशभरातही अनेक ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात योगदान असलेल्या सर्व ज्ञात- अज्ञात व्यक्तींचे कृतज्ञतापूर्वक स्मरण या दिवशी केले जाते.

इतिहास
१७७० पासून भारतावर इंग्रजांचे राज्य होते. १९ व्या शतकापासूनच सर्व राजांना इंग्रजांनी आपल्या सैन्यबळावर ताब्यात ठेवले होते. १८५७ च्या स्वातंत्र्यसमरानंतर ब्रिटिशांनी त्यांची व्यवस्था अजूनच शिस्तीची केली.१८८५ साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ची स्थापना झाली. २० व्या शतकात मोहनदास करमचंद गांधी ह्यांनी अहिंसेच्या मार्गाने चले जाओ आंदोलन व अशी अनेक आंदोलने केली. महात्मा गांधींनी सविनय कायदेभंग चळवळीचे नेतृत्व केले. १९२९ साली लाहोर च्या सत्रात काँग्रेसने संपूर्ण स्वराज्य ची घोषणा केली. 

त्यावेळी त्यांनी २६ जानेवारी ही तारीख भारताचा स्वातंत्र्यदिन म्हणून घोषणा करायची योजना केली. १९३० साली काँग्रेसने निवडणुका जिंकल्या. त्यानंतर संपूर्ण स्वराज्यासाठी सर्व नेत्यांनी असहकार आंदोलन केले. १९४० साली मुस्लिम कार्यकर्ते हे मुख्य प्रवाहापासून वेगळे झाले व त्यांनी ऑल इंडिया मुस्लिम लीग ची स्थापना केली. दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटिशांना लक्षात आले की आपल्याला भारतावरचे राज्य व युद्ध हे सांभाळता येणार नाही आहे. तसेच दुसऱ्या बाजूला भारतीय क्रांतिकारकांचा जोर वाढत होता. 

ही गोष्ट कळल्यानंतर ब्रिटनच्या पंतप्रधानानी जून १९४८ पर्यंत भारत पूर्णपणे स्वतंत्र करण्याची हमी दिली. अखेर दिनांक १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. पण जाताजाता त्यांनी भारतावर अजून एक घाव घालत भारताचे पाकिस्तान आणि भारत असे दोन तुकडे पाडले. पाकिस्तानी भागात राहणाऱ्या अनेक पंजाब्यांना व सिंधीना त्यांचे घरदार,पैसा सोडून यावे लागले. अनेक लोक ह्यामध्ये मारलेही गेले. 
Powered by Blogger.