मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गोदापात्रात उडी घेणाऱ्या तरूणाचा मृत्यू


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गोदापात्रात उडी घेणाऱ्या तरूणाचा मृत्यू झालाय. काकासाहेब शिंदे असं या तरूणाचं नाव आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी गोदावरी नदीपात्रात जलसमाधी आंदोलन केलं. हे आंदोलन सुरू असतानाच एका तरुणानं गोदावरी नदीपात्रात उडी घेतल्यानं खळबळ उडाली. 

Loading...
बराच वेळ हा तरूण पाण्यात मृत्यूशी झुंज देत होता. त्यानतंर या तरूणाला पाण्याबाहेर काढण्यात आलं पण दुदैवानं या तरूणाचा मृत्यू झालाय. औरंगाबादच्या कायगावमध्ये हे आंदोलन सुरू होतं. मराठा क्रांती आंदोलनाचा आज सहावा दिवस आहे. आणि गेल्या सहा दिवसांपासून राज्यातील विविध भागात या आंदोलनाचे पडसाद उमटताना पाहायला मिळतायेत..मात्र औरंगाबादमध्ये या आंदोलनाला वेगळंच वळण लागलं. काकासाहेब शिंदे या तरूणानं गोदापात्रात उडी घेतल्यानं त्याचा मृत्यू झालाय.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.