'मराठा क्रांती मोर्चा'कडून राज्य सरकारला इशारा.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी कायगाव टोक येथे पुलावरुन नदीत उडी मारलेल्या काकासाहेब दत्तात्रय शिंदे या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या संदर्भात 'मराठा क्रांती मोर्चा'कडून राज्य सरकारला इशारा देण्यात आला आहे. 

Loading...
आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही त्या तरुणाचे शव ताब्यात घेणार नाही आणि त्याचे अंत्यसंस्कार विधी करणार नाही, असा इशारा 'मराठा क्रांती मोर्चा'ने राज्य सरकारला दिला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेला देण्यात आलेल्या प्रतिक्रियेत मराठा क्रांती मोर्चाकडून काही मागण्या करण्यात आल्या. 

त्यात काकासाहेब शिंदे या जलसमाधी घेतलेल्या तरुणाला शहीद घोषित करा अशी मागणी प्रामुख्याने करण्यात आली आहे. यासह त्याच्या कुटुंबियांना ५० लाखांची मदत देण्यात यावी आणि काकासाहेब शिंदे या तरुणाच्या भावाला सरकारी नोकरीत रुजू करून घ्यावे, अशीही मागणी करण्यात आली आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.