मराठा समाज आंदोलनाला मुख्यमंत्रीच जबाबदार


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- मराठा आरक्षणाच्या मागणीवरून सुरू असलेल्या आंदोलनाला मुख्यमंत्री स्वत:च जबाबदार आहे. धनगर आणि मराठा समाजाला आरक्षण देऊ, असे त्यांनी स्वत:च आश्वासन दिले होते, ते त्यांनी पाळले नाही. त्यामुळे या समाजाचा संताप होत आहे, असा आरोप कॉंग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी सोमवारी केला. कॉंग्रेस भवन येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, अॅॅड. अभय छाजेड आदी उपस्थित होते. 

आषाढी एकादशीनिमित्त राज्याचे मुख्यमंत्री आणि वारकऱ्यांच्या हस्ते विठ्ठलाला अभिषेकाची परंपरा राहिली आहे. मुख्यमंत्री विठ्ठलाप्रती समर्पित आहेत तर त्यांनी या समर्पित भावनेने पंढरपूरला जायला हवे होते, असे मतही सिंह यांनी व्यक्त केले. जनतेचा सरकारवरील विश्वास उडत चालला आहे. खुद्द मित्र पक्ष साथ सोडत आहेत, हा देखील सरकारवरील अविश्‍वासच आहे. 
Loading...

केंद्र सरकार मधील मंत्र्यांनाही बोलण्याची मुभा नाही. "ना खाऊंगा ना खाने दुंगा', म्हणणारे मोदी राफेल विमान खरेदीबाबत माहिती देण्यास तयार नाहीत. यासाठी करारातील माहिती गुप्त असल्याचे कारण सांगितले जात आहे. परंतु फ्रान्सच्या राफेल कंपनीने वार्षिक ताळेबंदात ही माहिती उघड केली आहे. त्यामुळे मोदींचा खरा चेहरा उघड झाला आहे, अशी टीका सिंह यांनी दिली.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.