सरकारच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र बंदची हाक !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेण्यास राज्य शासन उशीर करतंय, त्यामुळेच काकासाहेब दत्तात्रय शिंदे या तरुणाला जीव गमवावा लागला असल्याचा आरोप करत मराठा क्रांती मोर्चा समन्वय समितीनं सरकारच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र बंदची हाक दिलीय. 


Loading...
आजचा महाराष्ट्र बंद अत्यंत शांततेत पाळण्यात येईल. सार्वजनिक परिवहन सेवा, ऍम्ब्युलन्स तसंच अन्य अत्यावश्यक सेवा या बंदमधून वगळण्यात येतील, असं समन्वय समितीनं स्पष्ट केलंय. येत्या दोन दिवसांत राज्य शासनानं मराठा समाजाच्या मागण्यांबाबत निर्णय घेतला नाही तर राज्यभर उद्रेक होईल. त्यातून उद्भवणाऱ्या स्थितीला पूर्णपणे शासन जबाबदार असेल असंही समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलंय.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.